Shiv Sena : निवडणूक आयोगाच्या 'त्या' निर्देशांविरोधात शिवसेनेची सुप्रीम कोर्टात धाव! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray, Eknath Shinde, Supreme Court
निवडणूक आयोगाच्या 'त्या' निर्देशांविरोधात शिवसेनेची सुप्रीम कोर्टात धाव!

निवडणूक आयोगाच्या 'त्या' निर्देशांविरोधात शिवसेनेची सुप्रीम कोर्टात धाव!

नवी दिल्ली : शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरुन सध्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मोठा संघर्ष पहायला मिळतो आहे. हे प्रकरण आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचलं असून आयोगानं यामध्ये दोन्ही दावेदारांना महत्वाचे निर्देष दिले आहेत. आयोगाच्या या निर्देशांविरोधात आता उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. (Shiv Sena run to Supreme Court against instructions of Election Commission)

निवडणूक आयोगानं शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांना ८ ऑगस्टपर्यंत पक्षाबाबतची सर्व कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाकडे जाईल याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्याच्या परिस्थितीत हे चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही, असं तज्ज्ञांचं मत आहे.

हेही वाचा: Uttar Pradesh Accident : डबल डेकर बसचा भीषण अपघात; आठ ठार, १६ जखमी

यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. शिंदे गटानं निवडणूक आयोगाकडं खरी शिवसेना कोणाची यासाठी दाखल केलेल्या अर्जावर निवडणूक आयोगानं कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले असून त्यानुसार निर्णय देणार आहे. पण निवडणूक आयोगाल याबाबत निर्णय घेण्यापासून रोखण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात केली आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात खटला सुरु असताना निवडणूक आयोग निर्णय देऊ शकत नाही, असंही ठाकरेंच्या याचिकेत म्हटलं आहे.

Web Title: Shiv Sena Run To Supreme Court Against Instructions Of Election Commission

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top