esakal | ठरलं! शिवसेना उत्तर प्रदेशात लढवणार सगळ्या जागा
sakal

बोलून बातमी शोधा

ठरलं! शिवसेना उत्तर प्रदेशात लढवणार सगळ्या जागा

ठरलं! शिवसेना उत्तर प्रदेशात लढवणार सगळ्या जागा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे देशातील सर्वांत मोठ्या राज्यातील विधानसभेवर ताबा मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आता तयारी करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आता महाराष्ट्रातील पक्ष शिवसेनेने देखील आपली कंबर कसली आहे. महाराष्ट्रात सत्ता मिळवल्यानंतर आता शिवसेनेचं लक्ष उत्तर प्रदेशकडे लागलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा: मुंबईची सुरक्षित शहर ही प्रतिमा डागाळू नये – मुख्यमंत्री

उत्तर प्रदेशात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना पक्ष सर्वच्या सर्व 403 जागांवर निवडणूक लढवणार आहे. शिवसेनेच्या प्रांतीय कार्यकारिणी बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे. या बैठकीमध्ये शिवसेनेने असा आरोप लावलाय की, उत्तर प्रदेशमध्ये भाजप सरकारच्या राजवटीत कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. तसेच योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात माता-भगिणी सुरक्षित नाहीयेत.

हेही वाचा: तालिबानी सरकारचा शपथविधी 'या' कारणाने लांबला

दारुलशफा इथे झालेल्या या बैठकीत राज्याचे शिवसेना प्रमुख ठाकूर अनिल सिंह यांनी म्हटलंय की, यूपीमध्ये सरकार ब्राह्मणांसोबत चांगला व्यवहार करत नाहीये. तसेच राज्यात आरोग्य आणि शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. बेरोजगारी आणि महागाईची समस्या देखील टीपेला पोहोचली असून जनता अनेक समस्यांनी त्रस्त झाली आहे.

loading image
go to top