D. K. Shivakumarsakal
देश
D. K. Shivakumar : शिवकुमार यांच्या विधानावरून गोंधळ; मुस्लिम आरक्षणासाठी राज्यघटनेत बदल करण्याच्या वक्तव्याचे पडसाद
Political Controversy : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी मुस्लिम आरक्षणासाठी राज्यघटनेत बदल करण्याचे वक्तव्य केले. या विधानावरून संसदेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये गदारोळ झाला.
नवी दिल्ली : मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यासाठी काँग्रेस पक्ष राज्यघटनेत बदल करेल, असे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांनी केलेल्या विधानावरून आज सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्षांच्या खासदारांची काँग्रेसच्या खासदारांशी खडाजंगी उडाल्यामुळे राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

