

आज संपूर्ण भारतभर छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. महाराष्ट्रासह देशभरात विविध कार्यक्रम, मिरवणुका आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे शिवरायांच्या विचारांना वंदन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यानिमित्त विशेष संदेश देत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे.