Tue, Feb 7, 2023

Shivananda Patil : पक्षाध्यक्षांनी विधानसभेसाठी जाहीर केली उमेदवारी, पण नशिबाने केला घात...
Published on : 21 January 2023, 4:50 am
बंगळुरू - दक्षिणेतील महत्त्वपूर्ण असलेल्या कर्नाटकमध्ये याच वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस, भाजप आणि जनता दल सेक्युलर या पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर जनता दल सेक्युलरकडून अनेक उमेदवार देखील निश्चित करण्यात आले आहेत. मात्र जेडीएसने निश्चित केलेल्या एका उमेदवारा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Shivananda Patil news in Marathi)
सिंदगी मतदारसंघातून पुढील विधानसभा निवडणुकीसाठी JD(S) उमेदवार म्हणून घोषित केलेले शिवानंद पाटील यांचे शुक्रवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. याबाबत पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी ट्विट केले.