Shivraj Patil Chakurkar: वाद पेटणार! गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला; शिवराज पाटलांचे विधान

 shivraj patil chakurkar controversial statement on geeta shri krishna arjun jihad
shivraj patil chakurkar controversial statement on geeta shri krishna arjun jihad

नवी दिल्ली: कॉंग्रेसचे नेते माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे एक वादग्रस्त वक्तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला, असं वादग्रस्त विधान माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटलांनी केलं आहे. शिवराज पाटील यांनी गीतेची तुलना जिहादशी केल्याने आता राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. दिल्लीमधील एका कार्यक्रमात हे विधान केल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

शिवराज पाटील चाकूरकर म्हणाले की, जिहादचा विषय तेव्हा येतो जेव्हा मनात स्वच्छ विचार असून देखील त्यापध्दतीचे काम करण्याचा प्रयत्न केल्यानंतर देखील कोणी ते समजून घेत नसेल तर म्हटले जाते की शक्तीचा उपयोग करावा लागला तर तो केला पाहिजे. हे फक्त कुराणमध्ये सांगितलेले नाहीये. तर ते महाभारतात जो गीतेचा भाग आहे त्यामध्ये श्रीकृष्ण देखील अर्जुनाला जिहाद बद्दलच सांगतात, असे शिवराज पाटील चाकूरकर म्हणाले आहेत.

 shivraj patil chakurkar controversial statement on geeta shri krishna arjun jihad
MCA Election: पवार-शेलार पॅनलचे अमोल काळे बनले MCAचे नवे अध्यक्ष

भाजपची प्रतिक्रिया..

भाजप अध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी या सगळ्यांमध्ये इटालीयन विचारधारा रुजवण्यात आली आहे, कॉंग्रेसचे नेत्यांनी त्यांचे डिएनए इटालीयन करून घेतले आहेत. यापेक्षा दुर्देवी वक्तव्य कॉंग्रेसच्या नेत्यांकडून अपेक्षित नाही. राजकीय पोळी भाजण्यासाठी आपल्या संस्कृती, दैवतांची विटंबना करण्याच्या वृत्तीची लाज वाटते असे ते म्हणाले आहेत.

 shivraj patil chakurkar controversial statement on geeta shri krishna arjun jihad
Pune News: पुण्यातील एमआयटी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या, धक्कादायक प्रकार उघड

कॉंग्रेसचे म्हणणे काय..

तर शिवराज पाटलांच्या विधानावर प्रतिक्रिया देतान कॉंग्रेसचे नेत सचिन सावंत यांनी भाजप नेत्यांच्या बौद्धिक दिवाळखोरीची लाज वाटते, जिहादचा खरा अर्थ संघर्ष आहे, स्वतःच्या शुद्धीसाठी केलेला संघर्ष याला देखील जिहाद म्हटले जाते. धर्माच्या अधर्माविरोधच्या लढाईला देखील जिहाद म्हटले जाते असे म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com