esakal | शिवसेना नेते संजय राऊत संध्याकाळी राहुल गांधींना भेटणार
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut

शिवसेना नेते संजय राऊत संध्याकाळी राहुल गांधींना भेटणार

sakal_logo
By
दीनानाथ परब

नवी दिल्ली: सध्या संपूर्ण देशात लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणाची चर्चा सुरु आहे. काल काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांना लखीमपूर खेरी येथे जाण्यापासून रोखण्यात आले होते. उत्तर प्रदेश सरकारकडून सुरु असलेल्या या दडपशाही विरोधात आवाज उठवण्याची गरज शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. संजय राऊत आज संध्याकाळी ४.१५ वाजता या संदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत.

"लखीमपूर खेरी हिंसाचाराने देशाला हादरवून सोडलं आहे. प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश सरकारने अटक केली होती. विरोधी पक्षाच्या नेत्यांना शेतकऱ्यांना भेटण्यापासून रोखण्यात येत आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून सुरु असलेल्या या दडपशाही विरोधात संयुक्तपणे एकत्र आवाज उठवणं आवश्यक आहे. आज या संदर्भात राहुल गांधींची भेट घेणार आहे" असं संजय राऊत यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा: शिवसेनेने युतीबाबत विचार करावा : रामदास आठवले

लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचारात (lakhimpur kheri violence) आठ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश होता. त्याचे पडसाद सर्वत्र उमटताना दिसत आहेत. "लखीमपूर खेरीमध्ये हिंसाचार झाला, त्या ठिकाणी माझा मुलगा आशिष हजर असल्याचे पुरावे मिळाले, तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन" असे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay mishra) यांनी सांगितले.

loading image
go to top