'फक्त भाषण करण्यासाठी शिवरायांचं नाव वापरलं जातं'

मी लोकसभेत निदर्शनं करूनही केंद्र सरकार याची दखल घेत नाहीत.
delhi
delhiesakal
Summary

मी लोकसभेत निदर्शनं करूनही केंद्र सरकार याची दखल घेत नाहीत.

नवी दिल्ली - कर्नाटकातील बंगळुरु येथे छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रकार घडला. यानंतर राज्यातील अनेक ठिकणांहून या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. यावर राज्यातील नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, या मुद्द्यावरून शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपला टोला लगावला आहे. मी लोकसभेत निदर्शनं करूनही केंद्र सरकार याची दखल घेत नाहीत. भाजपाच्या नेत्यांकडून फक्त भाषण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरले जाते, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. आज ते दिल्लीत बोलत होते.

delhi
बोलोरो गाड्यांचे कर्ज भरण्यासाठी राणेंनी प्रतिष्ठा पणाला लावावी; सावंत

यावेळी कर्नाटकातील बंगळुरु येथील घटनेविषयी ते म्हणाले, मी लोकसभेत निदर्शनं करूनही केंद्र सरकार याची दखल घेत नाहीत. भाजपाच्या नेत्यांकडून फक्त भाषण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद भाजपसोबत होते त्याचं पुढं काय झालं? देशाच आराध्य दैवत असलेल्या महाराजांचा अपमान होतो त्या वेळेला तुम्ही शांत का बसता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात आमचे सरकार म्हणून भगवद्गीतेचं त्रांगड आमच्यावर टाकल जातं. गोपाळ शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भगवद्गीता शिकवण्या संदर्भात सांगाव, अशी प्रतिक्रिया देत त्यांनी गोपाल शेट्टी यांना खोचक चिमटा काढला आहे.

delhi
'राष्ट्रवादीच्या घशात गेलेला मतदारसंघ काबीज केलाय; ...तर शिक्षेला तयार'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com