Eknath Shinde: शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रिपदं मिळणार? 'ही' नावं आहेत चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde Group

Eknath Shinde: शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रिपदं मिळणार? 'ही' नावं आहेत चर्चेत

मुंबई : राज्यात भाजपसोबत सरकार स्थापन करणाऱ्या एकनाथ शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रिपदं देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये एक कॅबिनेट तर दुसरं राज्यमंत्रीपद असेल. गजाननं किर्तीकर आणि हेमंत पाटील या दोन खासदारांना ही मंत्रिपदं मिळतील अशी माहिती साम टिव्हीच्या सुत्रांकडून मिळाली आहे. (ShivSena Shinde group may get two Portfolios in central govt)

हेही वाचा: Maharashtra Police Fake Recruitment: पोलीस भरतीची बनावट अधिसूचना व्हायरल; गुन्हा दाखल

सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेच्या शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रिपद देण्यात येणार आहे. यामध्ये एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद देण्यात येणार आहे. हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर केंद्रिय मंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे.

हेही वाचा: Sanjay Nirupam Mumbai : शिंदे गटातल्या खासदाराविरोधात रॅली आधीच निरुपम पोलिसांच्या ताब्यात

दरम्यान, केंद्रात मंत्रिपद देताना ज्येष्ठतेनुसार दिलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये गजानन कीर्तिकर आणि हेमंत पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. तर महिला म्हणून खासदार भावना गवळी यांचं नावही आघाडीवर आहे. त्याचबरोबर शिंदे गटात आलेल्या ज्येष्ठांना राज्यपालपदी नियुक्ती मिळावी म्हणूनही शिंदे गटाची केंद्रात लॉबिंग सुरु असल्याचं कळतंय, असंही सुत्रांनी सांगितलं आहे.

टॅग्स :Maharashtra NewsDesh news