लोक सोनियांना भेटतात आम्ही विठ्ठलाचं दर्शन घेऊ! शिवसेनेचा टोला

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 9 जुलै 2019

लोक दिल्लीत येऊन सोनिया गांधींची भेट घेतात; आम्ही पंढरपूरला जाऊन विठू माऊलीचे दर्शन घेऊ असा टोला शिवसेनेने मनसेप्रमुख राज ठाकरे यांना लगावला आहे.

नवी दिल्ली : लोक दिल्लीत येऊन सोनिया गांधींची भेट घेतात; आम्ही पंढरपूरला जाऊन विठू माऊलीचे दर्शन घेऊ असा टोला शिवसेनेने मनसेप्रमुख राज ठाकरे यांना लगावला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनाप्रमुख ठाकरे पंढरपुरात गेले आणि त्यांनी दर्शन घेतलं तर काय बिघडले असा उपरोधिक सवाल शिवसेनेचे संसदीय नेते संजय राऊत यांनी विचारला. दिल्लीत कोण कोणाला भेटतं याचे डायरी घेऊन आम्ही बसत नाही असेही ते म्हणाले राज ठाकरे यांनी काल काँग्रेस आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतली होती त्यानंतर या भेटीची राष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चा झाली या पार्श्वभूमीवर खा. राऊत यांनी वरील टिप्पणी केली. त्याच बरोबर दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भेटीच्या आठवणीही त्यांनी जागवल्या. इंदिरा गांधींची कोणाची तुलना होऊ शकत नाही. त्यांनी देश घडवला; पाकिस्तानचे तुकडे केले. तुकडे केले शिवसेना बरखास्तीचा डाव इंदिराजींनी हाणून पाडला अशा शब्दात राऊत यांनी वर्तमान युपीए नेतृत्वालाही चिमटा काढला.

हम साथ साथ है!
महाराष्ट्राचे आगामी मुख्यमंत्रीपद हा शिवसेना-भाजपच्या अजेंड्यावरचा सध्याचा विषय नाही असे सांगून राऊत म्हणाले की जागावाटप, विधानसभेसाठी एकत्र लढण्याची सदस्य तयारी हे सध्या युतीच्या अजेंड्यावरील विषय आहेत . मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल किंवा भाजपचा असेल तो आता आमचा असेल. युतीत आता मै ऐवजी हम याला महत्त्व आहे. मुख्यमंत्री कोणीही झाला तरी तो युतीचा असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena taunts Raj Thackeray on Sonia Gandhi meeting