'आयुष्य किती क्षणभंगूर'; CDS रावत यांच्या निधनावर सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त

लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण अपघातात जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नीसह १३ जणांचा बुधवारी मृत्यू झाला.
'आयुष्य किती क्षणभंगूर'; CDS रावत यांच्या निधनावर सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त

तमिळनाडूमधील कुन्नूर इथं लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण अपघातात संरक्षण दलाचे प्रमुख (सीडीएस) जनरल बिपीन रावत Bipin Rawat आणि त्यांच्या पत्नीसह १३ जणांचा बुधवारी मृत्यू झाला. या दुर्घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जनरल बिपीन रावत हे 'एमआय- १७ व्ही ५' हेलिकॉप्टरने तमिळनाडूमधील वेलिंग्टन इथल्या संरक्षण दलाच्या महाविद्यालयातील (डीएसएससी) कार्यक्रमासाठी जात असताना हा भीषण अपघात झाला. या हेलिकॉप्टरमध्ये रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह १४ जण होते. या दुर्घटनेतील रावत यांच्यासह १३ जणांच्या मृत्यूबद्दल सर्व स्तरांतून शोक व्यक्त होत आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला. (Gen Bipin Rawat Chopper Crash)

जनरल बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्या निधनाने अतीव दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबाबद्दल सहवेदना, असं ट्विट अभिनेता सलमान खानने केलं. 'जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी आणि भारतीय सशस्त्र दलाच्या जवानांच्या निधनाने मोठा धक्का बसला, दु:ख झालं. त्यांनी देशासाठी केलेल्या नि:स्वार्थ सेवेला सलाम,' अशा शब्दांत निर्माता, दिग्दर्शक करण जोहरने श्रद्धांजली वाहिली. 'आयुष्य किती क्षणभंगूर असतं हे पाहून धक्का बसला. जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका यांच्यासह अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमधील इतरांचा मृत्यू दु:खद आहे. त्यांचं कार्य देशाच्या कायम स्मरणात राहील', असं ट्विट अभिनेत्री भूमी पेडणेकरने केलं. याशिवाय रवीना टंडन, अर्जुन रामपाल, क्रिकेटर विराट कोहली यांनीसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट लिहित शोक व्यक्त केला.

'आयुष्य किती क्षणभंगूर'; CDS रावत यांच्या निधनावर सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त
'दोन सेकंद धस्सं झालं काळजात..'; विशाखा सुभेदारची पोस्ट चर्चेत

जनरल बिपीन रावत हे भारतीय संरक्षण दलांचे पहिले प्रमुख (सीडीएस) होते. ३१ डिसेंबर २०१९ रोजी त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. तत्पूर्वी, ३१ डिसेंबर २०१६ ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत ते लष्करप्रमुख होते. हेलिकॉप्टर अपघात नेमका कसा झाला, याबाबत संदिग्धता असून याप्रकरणी हवाई दलाने चौकशीचे आदेश दिले आहेत. अपघातस्थळी दाट धुकं होतं. मात्र, चौकशीतून अपघाताचं कारण कळू शकेल आणि त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, असं हवाई दलाने म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com