
बहराइच : उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील मदरशातील दहावीमधील विद्यार्थ्यांना त्यांचे स्वतःचे नावदेखील इंग्रजीमध्ये लिहिता येत नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा येथील मदरशांना अचानकपणे भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला, तेव्हा येथील शिक्षणाची दयनीय स्थिती लक्षात आली.