Sun, June 11, 2023

Delhi Earthquake: नोएडा ते पाकिस्तान, थरकाप उडवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Published on : 21 March 2023, 5:38 pm
दिल्ली-एनसीआरसह संपूर्ण उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानातील फैजाबाद येथे होता. पाकिस्तानातील इस्लामाबाद, लाहोर आणि पेशावरमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.
वसुंधरा, गाझियाबाद येथे लोकांनी घराबाहेर धाव घेतली.
जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या डोंगराळ राज्यांमध्येही भूकंपाचे धक्के बसले आहेत.
इस्लामाबादमध्ये देखील भूकंप धक्के जाणवले.
यावेळी भूकंपाचे एकापाठोपाठ दोन धक्के बसले आहेत. भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान असल्याचे सांगण्यात येत आहे. भूकंपाच्या भीतीमुळे दिल्ली, गाझियाबाद, नोएडा, गुरुग्रामसह एनसीआरमधील अनेक शहरांमध्ये लोक घराबाहेर पडले. गेल्या अनेक वर्षांत पहिल्यांदाच एवढ्या तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.