esakal | काश्मीरचं कौतुक; 'या' जिल्ह्यात सर्व 45+ लोकसंख्येला मिळाली लस
sakal

बोलून बातमी शोधा

काश्मीरचं कौतुक; एका जिल्ह्यात सर्व 45+ लोकसंख्येला मिळाली लस

काश्मीरचं कौतुक; एका जिल्ह्यात सर्व 45+ लोकसंख्येला मिळाली लस

sakal_logo
By
विनायक होगाडे

श्रीनगर : देशात सध्या कोरोनाच्या संकटाने धुमाकूळ घातलं आहे. अनेक लोक सध्या कोरोनाच्या विषाणूने मृत्यूमुखी पडत असून देशातील आरोग्य यंत्रणेवर अभूतपूर्व असा ताण आहे. सध्या देशात लसीकरण मोहिम सुरु आहे. देशात अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा आहे. मात्र, एक यासंदर्भात काश्मीरमधून एक सकारात्मक बातमी समोर येत आहे. जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यामध्ये 45 वर्षाहून अधिक वयाच्या सगळ्या लोकांना लसीचा पहिला डोस दिला गेला आहे. जिल्हा आरोग्य विभागानुसार, अशाप्रकारे सर्वांचे लसीकरण पूर्ण करणारा शोपियां हा देशातील दुसरा आणि काश्मीरमधला पहिला जिल्हा बनला आहे. (The Shopian administration in south Kashmir achieve 100% vaccination of the 45-plus present in its jurisdiction)

हेही वाचा: रामदेव बाबा अडचणीत, IMA नं पाठवली 1 हजार कोटींची मानहानीची नोटीस

याप्रकारे मिळालं यश

शोपियांमध्ये मुख्य लसीकरण अधिकारी गुलजार अहमद बाबा यांनी सांगितलं की, आम्ही धर्म प्रचारकांच्या मदतीने लसीकरणासंदर्भात लोकांच्या मनातील भीती दूर केली आणि बूथ लेव्हल अधिकाऱ्यांसोबत वोटर डाटाचा वापर करुन 45 हून अधिक वयाच्या 100 टक्के लोकसंख्येचं लसीकरण केलं. या मोहिमेत अंगणवाडी कार्यकर्त्यांनी देखील मोठी भुमिका निभावली तसेच घरोघरी जाऊन लोकांना लस घेण्यासाठी प्रेरणा दिली.

हेही वाचा: पाच महिन्यांपासून युवकाची म्युकरमायकोसिसशी झुंज; 41 लाख खर्च

दररोज 100 ते 150 जणांना लस

अधिकाऱ्यांनी म्हटलंय की टार्गेटमधील 78,769 लोकांना पहिला डोस दिला गेला आहे. आरोग्य विभागाच्या वतीने 70 लसीकरण सेंटरची स्थापना केली गेली आहे, ज्याठिकाणी जवळपास 100 ते 150 लोकांना लस दिली गेली. अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, शोपियां जिल्हाची लोकसंख्या ही 2011 च्या जनगणनेनुसार, 2.6 लाखाहून वाढून तीन लाख झाली आहे. या ठिकाणी लसीची कमतरता नाहीये, त्यामुळे मोहिम अधिक गतीने पुढे नेता येऊ शकते.