आप आमदाराच्या गाड्यांवर गोळीबार; एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 February 2020

आपचे नवनिर्वाचित आमदार नरेश यादव यांच्या वाहनांच्या ताफ्यावर काही अज्ञातांनी मंगळवारी रात्री गोळीबार केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. या गोळीबारामध्ये पक्षाचा एक कार्यकर्ता मृत्युमुखी पडला.

नवी दिल्ली : आपचे नवनिर्वाचित आमदार नरेश यादव यांच्या वाहनांच्या ताफ्यावर काही अज्ञातांनी मंगळवारी रात्री गोळीबार केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. या गोळीबारामध्ये पक्षाचा एक कार्यकर्ता मृत्युमुखी पडला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

किशनगड गावामध्ये ही घटना घडली. यादव हे त्यांच्या समर्थकांसह घरी परतत असतानाच रात्री त्यांच्या वाहनांवर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

वैयक्तिक वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे दिसून येते, असे पोलिसांनी म्हटले आहे. आरोपींनी यादव यांच्या वाहनाच्या दिशेने सात फैरी झाडल्या. अशोक मान असे या गोळीबारामध्ये मरण पावलेल्या कार्यकर्त्याचे नाव असून, जखमी झालेल्या अन्य एकास तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे आपचे खासदार संजय सिंह यांनी सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shots fired at the convoy of Naresh Yadav AAP MLA