

Shringi Rishi Ashram in Uttarakhand is planned for development as a religious tourism destination.
esakal
उत्तराखंड: उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यातील थलीसैंण परिसरात दूधातोली पर्वतरांगेत समुद्रसपाटीपासून सुमारे ६,५०० फूट उंचीवर असलेल्या रामायणकालीन श्रृंग ऋषी आश्रमाचा विकास करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. पुढील दोन वर्षांत येथे भव्य मंदिर, धर्मशाळा आणि श्रृंग ऋषींची विशाल प्रतिमा उभारण्याची योजना आहे. या स्थळाला धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर महत्त्वाचे स्थान मिळवून देण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येणार आहे.