
संपूर्ण देशाला हदरवणाऱ्या बहुचर्चित श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावालाच्या पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ करण्यात आली आहे. आज त्याची 5 दिवसांची पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साकेत न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. श्रद्धाला २ वर्षापूर्वीच मृत्यूची कुणकुण लागली होती असे पत्र मिळाले आहे. (Shraddha Murder Case 2 years ago Shraddha knew that she would die vasai police )
२ वर्षापूर्वीच लागली होती मृत्यूची कुणकुण?
श्रद्धा हत्याकांडात श्रद्धाचा दोन वर्षापूर्वीच एक पत्र पोलिसांच्या हाती लागलं आहे. 2020 मध्ये श्रद्धाने वसई पोलिसांकडे आफताबविरोधात लेखी तक्रार केली होती. या तक्रारीमध्ये श्रद्धानं आफताब ब्लॅकमेल करायचा. शिवीगाळ करुन मला मारायचा, गळा दाबून हत्या करण्याचाही प्रयत्न केला अशी तक्रार श्रद्धाने यात दिलीय. माझी हत्या करुन तुकडे करेल अशी धमकीही आफताबनं दिल्याचं श्रद्धाच्या तक्रारीत म्हटले आहे. हे पत्र 28 नोव्हेंबर 2020 रोजीचे आहे.
श्रद्धाची हत्या करणाऱ्या आफताबची आज पॉलिग्राफ टेस्ट होणार आहे. न्यायालयाने दिल्ली पोलिसांना त्यासाठी परवानगी दिली आहे. यापूर्वी दिल्ली पोलिसांनी आफताब चुकीची माहिती देत तपास वळवत असल्याचं न्यायालयाला सांगितलं होतं. मागील आठवड्यात न्यायालयाने नार्को चाचणीलाही परवानगी दिली होती.
हेही वाचा: Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अलिकडे श्रद्धा आणि आफताब यादोघांमध्ये भांडणं वाढली होती. या दोघांनाही एकमेकांवर संशय होता. आफताबला वाटत होतं की श्रद्धाच्या आयुष्यात दुसरं कुणीतरी आहे. तर श्रद्धा हा दावा करत होती की आफताबच्या आयुष्यात दुसरं कुणीतरी आलं आहे. याच वादातून आफताबने 18 मे 2022 ला श्रद्धाचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.