Shraddha Murder Case : दिल्ली पोलिसांना मोठं यश! ज्यानं श्रद्धाच्या शरीराचे तुकडे केले ते हत्यार जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shraddha Murder Case

Shraddha Murder Case : दिल्ली पोलिसांना मोठं यश! ज्यानं श्रद्धाच्या शरीराचे तुकडे केले ते हत्यार जप्त

नवी दिल्ली : Shraddha Murder Case : श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या तपासातून मोठा पुरावा हाती आला आहे. मुख्य आरोपी अफताब पूनावाला यानं ज्या हत्यारानं श्रद्धाच्या शरीराचे तुकडे केले ते हत्यार पोलिसांच्या हाती आलं आहे.

त्यामुळं या केसमधील हा सर्वात महत्वाचा आणि मोठा पुरावा ठरणार आहे. (Shraddha murder case Delhi Police recovered some weapons that were used to chop off Shraddha body)

दिल्ली पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांना श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाचा तपास करत असताना काही हत्यारं सापडली आहेत. या हत्यारांनी श्रद्धाचा लिव्ह इन पार्टनर आणि मुख्य आरोपी अफताब यांनं श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे केले.

त्याचबरोबर पोलिसांना श्रद्धाची एक अंगठीही सापडली असून जी अफताबनं नंतर दुसऱ्या मुलीला गिफ्ट केली होती. जिला त्यानं आपल्या छतरपूर येथील फ्लॅटवर बोलावलं होतं.

हेही वाचा: Rishikesh Deshmukh: अनिल देशमुखांचे पुत्र ऋषीकेश यांना मोठा दिलासा; कोर्टाकडून जामीन मंजूर

दरम्यान, आफताबनं इंटरनेटवरून रक्ताचे डाग मिटविण्यासाठीची माहिती सर्च केली होती. त्यानुसार त्यानं श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केल्यावर रक्ताचे सर्व डाग एका खास रसायनानं मिटवले होते.

मात्र, हत्येच्या दिवशी आफताबनं परिधान केलेल्या कपड्यांवर रक्ताचे डाग असावेत, असा अंदाज फॉरेन्सिक टीमनं वर्तवला होता. पण यासाठी घटनेच्या दिवशी श्रद्धा आणि आफताबनं परिधान केलेले कपडे पोलिसांना अद्याप मिळू शकलेले नाहीत.

हेही वाचा - काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली?