Shraddha Murder Case : नार्को टेस्ट आणि लाय डिटेक्टरमध्ये नेमका फरक काय?

एखाद्या गुन्ह्यातील सत्य बाहेर यावं म्हणून एकतर लाय डिटेक्टरचा वापर केला जातो किंवा नार्को टेस्ट केली जाते.
Shraddha Murder Case
Shraddha Murder Caseesakal
Updated on

What is Difference Between Narco Test And Lei Detector : श्रध्दा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताबची नार्को टेस्ट करण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली आहे. एखाद्या गुन्ह्यातील सत्य बाहेर यावं म्हणून एकतर लाय डिटेक्टरचा वापर केला जातो किंवा नार्को टेस्ट केली जाते.

आरोपीकडून सत्य काढून घेण्यासाठी या दोन्ही पध्दती आहेत. पण तुम्हाला माहित आहे का, या दोन्हीत नेमका फरक काय आहे? चला जाणून घेऊया नेमका फरक.

काय असते नार्को टेस्ट?

ही टेस्ट करत असताना तेथे फॉरेन्सिक तज्ज्ञ, डॉक्टर आणि मानसशास्त्रज्ञ उपस्थित असतात. या टेस्टमध्ये आरोपीला काही औषधं दिले जातात, ज्यामुळे त्याचा ब्रेन सूस्त होतो. ज्यामुळे आरोपीची विचार करण्याची क्षमता कमी होते आणि तो खरं बोलायला लागतो.

Shraddha Murder Case
Shraddha Murder Case : श्रध्दासारखी बॉलिवूडमधल्या 'या' अभिनेत्रींची झाली होती फसवणूक, त्यांचेही...

लाय डिटेक्टर टेस्ट काय असते ?

लाय डिटेक्टर टेस्ट हा शब्द आपण बऱ्याचदा ऐकतो. यालाच पॉलीग्राफ टेस्टपण म्हटलं जातं. आरोपी खोटं बोलतो आहे का? हे ओळखून सत्य काढून घेण्यासाठी ही टेस्ट केली जाते.

Shraddha Murder Case
Shraddha Murder Case : आफताबला शिक्षेपर्यंत पोहोचवण्यात मदत करणारे १० पुरावे कोणते?

या टेस्टसाठी शरीराच्या काही अंगांवर इसीजीप्रमाणे काही तारा आणि नळ्या लावल्या जातात. त्यानंतर तज्ज्ञ आरोपीला प्रश्न विचारतात. आरोपी उत्तर देत असताना त्याचं ब्लड प्रेशर, श्वासाची गती, पल्स रेट, हाता-पायाची हालचाल अशा गोष्टी हे मशिन रेकॉर्ड करतं. यावरून आरोपी खरं बोलतोय की खोटं हे ठरवलं जातं.

Shraddha Murder Case
Shraddha Murder Case : नार्को टेस्ट म्हणजे काय? ही टेस्ट कशी केली जाते?

कोणती टेस्ट असते विश्वासार्ह

नार्को टेस्ट असो किंवा पॉलीग्राफ टेस्ट दोन्हीमध्ये फेल होण्याची शक्यता असतेच. पण तरीही नार्को टेस्ट अधिक विश्वासार्ह समजली जाते. कारण यात आरोपी अर्ध शुध्दीत असतो त्यामुळे त्याची विचार करण्याची पर्यायाने खोटं बोलण्याची शक्यता कमी असते. तर लाय डिटेक्टर टेस्टमध्ये आरोपी पूर्ण शुध्दीत असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com