Shraddha Walkar Murder Case : श्रद्धाच्या खुनाबाबत लवकरच आरोपपत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

shraddha Walkar Murder Case

Shraddha Walkar Murder Case : श्रद्धाच्या खुनाबाबत लवकरच आरोपपत्र

नवी दिल्ली : श्रद्धा वालकर खून प्रकरणी पोलिसांनी आरोपपत्राचा मसुदा तयार केला असून लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. आरोपपत्राचा मसुदा तीन हजार पानांचा असून, १०० साक्षीदारांच्या साक्षी, न्यायवैद्यक तज्ज्ञांचा अहवाल आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्यांचा त्यात समावेश आहे. या महिना अखेरीपर्यंत आरोपपत्र न्यायालयात सादर केले जाण्याची शक्यता आहे.

छतरपूरच्या जंगलात मिळालेली हाडे ही श्रद्धाची असल्याचे डीएनए अहवालावरून स्पष्ट झाले आहे. याशिवाय श्रद्धाचा मित्र आफताब पूनावाला याचा कबुलीजबाब, नार्को चाचणीचा अहवाल, यांचाही समावेश मसुद्यात करण्यात आला आहे. वास्तविकतः पोलिसांकडे दिलेला जबाब आणि नार्को चाचणीचे निष्कर्ष यांना न्यायालयीन प्रक्रियेमध्ये फारसे स्थान नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दिल्ली पोलिसांनी तयार केलेल्या आरोपपत्राच्या मसुद्याची तपासणी कायदेतज्ज्ञ सध्या करत आहेत.

श्रद्धाचा मित्र आफताब पूनावालाने गेल्यावर्षी १८ मे रोजी श्रद्धाचा गळा दाबून खून केला होता. त्यानंतर तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले होते. त्यानंतर अनेक दिवस तो रात्री उशिरा हे तुकडे छतरपूरच्या जंगलात टाकत होता.

मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरलेली करवत गुरुग्राममध्ये झाडांत तर एक चाकू दक्षिण दिल्लीतील एका कचरापेटीत टाकून दिला होता. अनेक महिन्यांत मुलीची खबरबात न मिळाल्याने श्रद्धाच्या वडिलांनी पोलिसांशी संपर्क साधला होता.

त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला होता. पोलिसांनी या प्रकरणी आफताबला १२ नोव्हेंबर २०२२ रोजी अटक केली होती.

टॅग्स :policecrimedelhi