
मशीद कधी बांधली यावरून फरक पडत नाही. बाबरच्या काळात मशीद उभारण्यात आली. बाबरी मशीद रिकाम्या जागी बनलेली नव्हती. 1949 मध्ये मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचा दावा न्यायालयाने फेटाळला.
नवी दिल्ली : बाबरी मशीद ज्याठिकाणी उभारली होती. त्याठिकाणी मोठी वास्तू होती आणि जुने स्तंभ व दगड होते. मशीदिच्या बांधकामात जुन्या दगडांचा वापर केला होता. मशिदीच्या खाली मंदिराचे अवशेष असल्याचा पुरातत्व विभागाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला आहे. हिंदूकडून तेथे पुजा करण्यात येत होती, असे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे.
मशीद कधी बांधली यावरून फरक पडत नाही. बाबरच्या काळात मशीद उभारण्यात आली. बाबरी मशीद रिकाम्या जागी बनलेली नव्हती. 1949 मध्ये मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचा दावा न्यायालयाने फेटाळला. तसेच निर्मोही आखाड्याचाही दावा न्यायालयाने फेटाळला. निर्मोही आखाडा सेवक नाहीत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. रामलल्लाला न्यायालयाने कायदेशीर मान्यता दिली.
अयोध्येतील ऐतिहासिक रामजन्मभूमी- बाबरी मशीद जमीनवादासंदर्भात सर्वोच्च न्यायालय आज (ता. 9) ऐतिहासिक निकाल देणार आहे. सकाळी साडेदहापासून ही सुनावणी सुरू झाली. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठ हा निकाल देईल. सर्वोच्च न्यायालयाकडून अयोध्याप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या घटनापीठामध्ये सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासह न्या. शरद बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. अब्दुल नजीर यांचा समावेश आहे.