भाविकांसाठी आनंदाची बातमी! आता घरबसल्या फक्त २५ रुपयांत करता येणार सोमनाथ महादेवाची बिल्वपूजा; ट्रस्टचा महत्त्वपूर्ण निर्णय
Somnath Bilvapuja : ‘जन जन का सोमनाथ’ या संकल्पने अंतर्गत सुरू झालेल्या या उपक्रमाद्वारे, कोणताही भक्त आपल्या घरातून ऑनलाइन (Online Shiva Puja) २५ रुपये शुल्क भरून ही पूजा नोंदवू शकतो.
सोमनाथ : श्रावण महिन्यात शिवभक्तांना घरबसल्या श्री सोमनाथ महादेवाची बिल्वपूजा (Somnath Bilvapuja) करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. श्री सोमनाथ ट्रस्टने (Shri Somnath Trust’s) केवळ २५ रुपयांत ही सेवा पुन्हा सुरू केली आहे.