
नवी दिल्ली : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार दोघेही आज दिल्लीत आल्याने राज्यातील मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे. मात्र, ‘मुख्यमंत्रिपदाची खुर्ची रिकामी नाही, पूर्ण पाचवर्षे मीच मुख्यमंत्री राहणार असा स्पष्ट निर्वाळा देत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या अटकळबाजीला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला.