काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांनी भाजपची तुलना केली वेश्येसोबत

वृत्तसंस्था
Saturday, 31 August 2019

- कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांनी भाजपवर टीका केली.

- भाजपची तुलना केली वेश्येसोबत. 

बंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी भाजपवर टीका करत वादग्रस्त वक्तव्य केले. त्यांनी भाजपची तुलना वेश्येसोबत केली. ते म्हणाले, वेश्यांना जेव्हा नाचता येत नाही तेव्हा त्या तेथील जमिनीलाच (फ्लोअर) दोष देतात, डान्स फ्लोअर चांगली नसल्याचे कारण त्यांच्याकडून दिले जाते. अशाचप्रकारे सध्या भाजपचे सुरु आहे.

काँग्रेसेची धर्मनिरपेक्ष जनता दलसोबतची (जेडीएस) आघाडी तुटली. त्याबाबत सिद्धरामय्या म्हणाले, वेश्या जेव्हा नृत्य करतात तेव्हा त्या डान्स फ्लोअरबाबत कोणतीही तक्रार करत नाही. मात्र, ज्यांना खरंच नृत्य करता येत नाही. त्यांच्याकडून अशाप्रकारची कारणे दिली जातात. हा संदर्भ मी भाजपबाबत जोडत आहे. इतर कोणासोबत नाही, असेही ते म्हणाले.

दरम्यान, सिद्धरामय्या यांनी हे वादग्रस्त विधान केल्यानंतर आता नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: siddharamaiyah compares bjp leader with prostitutes