Sidhu Moose Wala Murder Case: पंजाब पोलिसांकडून बिश्नोईला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

siddhu moosewala bishnoi

सि्दधू मुसेवाला हत्या प्रकरण: पंजाब पोलिसांकडून बिश्नोईला अटक

नवी दिल्ली : प्रसिद्ध गायक सुद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर गँगस्टार लॉरेन्स बिश्नोई याला कायदेशीररित्या अटक करण्याची परवानगी दिल्ली कोर्टाने पंजाब पोलिसांना दिली होती. त्यानंतर पंजाब पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई याला अटक केली आहे.

(Siddhu Moosewala Murder Case Updates)

हेही वाचा: 'मराठी आणि गुजरातीचं नातं आणखी दृढ व्हावं': उद्धव ठाकरे

दरम्यान या हत्येनंतर तिहार जेलमध्ये कैदेत असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याची पोलिस कसून चौकशी करत आहेत. मुसेवालाच्या हत्येत आपला संबंध नसल्याचे बिश्नोई याने म्हटले आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, सिद्धू मुसेवाला यांची हत्या ही सुडाच्या भावनेने घेण्यात आल्याचे बिश्नोई याने म्हटले असून, या घटनेत आपला हात नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर चौकशीसाठी त्याला पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर अनेक जणांनी या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. परंतु, अद्यापपर्यंत मुख्य आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश आलेले नाही. चौकशीदरम्यान लॉरेन्सने पोलिसांना सांगितले की, गोल्डी ब्रारला माहिती मिळाली होती की, मुसेवालाने ब्रारच्या मॅनेजरला परदेशात पळून जाण्यास मदत केली होती, ज्याचा विकी मुठीखेडा यांच्या हत्येशी संबंध असल्याचा आरोप आहे. दरम्यान, मुसेवालाच्या हत्येनंतर सोशल मीडियावर जे मेसेज पाठवले जात आहेत ते एकतर परदेशातून किंवा व्हीपीएनद्वारे पाठवले जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

हेही वाचा: आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्र्याच्या गाडीत बसण्यापासून रोखलं; उद्धव ठाकरेंची नाराजी

गायक सिद्धू मुसेवाला याची सुरक्षा काढून घेतल्यानंतर अवघ्या एका दिवसात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दरम्यान शवविच्छेदन अहवालात त्याच्या शरिरात तब्बल १९ गोळ्या लागल्याचं आढळलं होतं.

Web Title: Sidhu Moose Wala Murder Case Lorence Bishnoi Arrest Court Permission

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :crimeCourt
go to top