
नवी दिल्ली : बालहक्कांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या एका संघटनेने केलेल्या एका नवीन अभ्यासाच्या अहवालातील निष्कर्षानुसार भारतातील अगरबत्ती उत्पादन उद्योगातील बालमजुरीमध्ये लक्षणीय घट झाली आहे. बिहार, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात केलेल्या अभ्यासात या क्षेत्रातून बालमजुरी निर्मूलनात उल्लेखनीय प्रगती झाल्याचे निदर्शनास आले.