
नवी दिल्ली : चांदी आणि चांदीचे दागिने, वस्तूंसाठीही आता हॉलमार्किंग अनिवार्य करण्याबाबत आता भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) पुढील कार्यवाही करावी, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोमवारी ७८ व्या बीआयएस स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना ही सूचना केली. सध्या चांदीचे हॉलमार्किंग ऐच्छिक आहे.