
स्थानिक पातळीवर मागणी घटल्याचा फटका सोमवारी सोने आणि चांदीला बसला. सोन्याच्या भावात प्रतिदहा ग्रॅमला 300 रुपयांची, तर चांदीच्या भावात प्रतिकिलोमागे तब्बल 1 हजार 400 रुपयांची घसरण आज झाली.
चांदीची चमक उतरली; किलोमागे एवढ्या रुपयांची घसरण
नवी दिल्ली ः स्थानिक पातळीवर मागणी घटल्याचा फटका सोमवारी सोने आणि चांदीला बसला. सोन्याच्या भावात प्रतिदहा ग्रॅमला 300 रुपयांची, तर चांदीच्या भावात प्रतिकिलोमागे तब्बल 1 हजार 400 रुपयांची घसरण आज झाली.
दिल्लीतील सराफा बाजारात आज शुद्ध सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमला 300 रुपयांची घट होऊन 39 हजार 225 रुपयांवर आला. स्थानिक पातळीवर कमी झालेली मागणी आणि डॉलरच्या तुलनेत स्थिर असलेला रुपया यामुळे सोन्याच्या भावात घसरण झाली. मागील काही काळात सोन्याच्या भावाने उच्चांकी पातळी गाठल्याने सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अद्याप सोन्याची मागणी वाढलेली नाही. याचा फटका सोन्याच्या भावाला बसत आहे. चांदीचा भाव आज प्रतिकिलो 1 हजार 400 रुपयांची घसरण होऊन 48 हजार 500 रुपयांवर आला.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचा भाव आज प्रतिऔंस 1 हजार 506 डॉलरवर स्थिर राहिला. याच वेळी चांदीच्या भावात घसरण होऊन तो प्रतिऔंसला 18.05 डॉलरवर आला. अमेरिकेची मध्यवर्ती बॅंक "फेडरल रिझर्व्ह'च्या व्याजदर कपातीबाबात अद्याप अनिश्चितता कायम असून, अमेरिका- चीन व्यापार चर्चेचा परिणाम आगामी काळात सोन्याच्या भावावर होईल, अशी शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
Web Title: Silver Prices Falls Down New Delhi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..