

Madhya Pradesh Chief Minister Mohan Yadav announces a peacock conservation project and development initiatives ahead of Sinhastha 2028.
esakal
राज्यात मोरांचे संवर्धन आणि पुनर्वसन करण्यासाठी नवीन प्रकल्प राबवण्यात येणार असल्याची घोषणा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी केली. उज्जैन जिल्ह्यातील बडनगर येथे विकासकामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी बडनगरमध्ये फूड प्रोसेसिंग पार्क आणि गीता भवन उभारण्याची घोषणाही केली. तसेच उज्जैन आणि आगर-माळवा येथे सुरू होणाऱ्या बटाटा प्रक्रिया युनिट्सच्या माध्यमातून राज्यातील ३५ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांकडून थेट बटाटा खरेदी करण्याची योजना असल्याचे सांगितले.