up police half encounter
sakal
उत्तर प्रदेश पोलिसांच्या गुन्हेगारांविरुद्धच्या कडक कारवाईचा धडाका सध्या चर्चेत आहे. विशेषतः चकमकीच्या भीतीने गुन्हेगारांमध्ये बसलेली दहशत कानपूरमध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळाली. एका महिला पोलीस कर्मचाऱ्याची लूट करणाऱ्या सराईत गुन्हेगाराने पोलिसांच्या 'हाफ एन्काउंटर'च्या भीतीने आपल्या कुटुंबासह पोलीस ठाण्यात धाव घेत आत्मसमर्पण केले. "साहेब, मी हजर झालो आहे, आता मला लंगडा करू नका," अशी विनवणी करत त्याने पोलिसांसमोर शरणागती पत्करली.