
लखीमपूर प्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे.
लखीमपूर खेरी हत्याकांड हे पूर्वनियोजित कट - SIT
लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) प्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांच्या मुलाच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे. केंद्रीय अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) याच्यासह १३ आरोपींविरोधातील गुन्ह्यातून एसआयटीने आता अपघाताची कलमे हटवली आहेत. याऐवजी आता हत्येचा प्रयत्न आणि एकत्र येऊन गुन्हा कऱणे इत्यादी कलमे लावण्यात येणार आहेत. तसंच रिमांडची मागणीही करण्यात आली आहे. एसआयटी चौकशी अधिकारी प्रदीप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटना जाणीवपूर्वक आणि कट रचून घडवून आणल्याचं म्हटलं आहे.
एसआयटीने हा हिंसाचार पूर्वनियोजित कट असल्याचा निष्कर्ष काढला असून केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्यावर सध्या खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. आता हा कट असल्याचं स्पष्ट झालं असून त्याच्याविरोधात खुनाचा प्रयत्नाचे गुन्हेही दाखल करण्यात येणार आहेत. एसआयटीने याबाबतची माहिती तपासावर देखरेख करणाऱ्या न्यायाधीशांना दिली आहे.
हेही वाचा: पंतप्रधानांच्या संसदेतील अनुपस्थितीवरुन राहुल गांधींचा निशाणा
लखीमपूर खिरीमध्ये ३ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना चिरडण्यात आले होते. या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. तर त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात आणखी चार जणांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला या प्रकरणी अटक करण्यात आली होती. आतापर्यंत जवळपास १३ जणांना अटक झाली आहे.
लखीमपूर खिरीमध्ये ३ ऑक्टोबरला झालेल्या या घटनेत केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशिष मिश्रासह इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये लावण्यात आलेले कलम बदलण्याची याचिका एसआयटी विद्या राम दिवाकर यांनी न्यायालयात दाखल केली होती. ही घटना बेजबाबदारपणा किंवा अपघात न मानता एक कट, जीवे मारण्याच्या हेतूने केलेला गुन्हा असल्याचं विद्या राम दिवाकर यांनी म्हटलं आहे. न्यायालयाने याबाबत सर्व आरोपींना नोटीस पाठवली आहे.
Web Title:
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..