esakal | महात्मा गांधी जयंतीनिमित्त सहाशे कैद्यांची सुटका होणार 
sakal

बोलून बातमी शोधा

jail.jpg

महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त देशभरातील तुरुंगात किरकोळ गुन्ह्याप्रकरणी शिक्षा भोगणाऱ्या शेकडो कैद्यांची सुटका करण्यात येणार आहे. मात्र, हत्या, बलात्कार, दहशतवादी कारवाया आणि भ्रष्टाचार गुन्ह्यातील कैद्यांची सुटका होणार नाही. येत्या दोन ऑक्‍टोबर रोजी सुमारे 600 कैद्यांची सुटका होऊ शकते, असे अधिकाऱ्याने म्हटले आहे.

महात्मा गांधी जयंतीनिमित्त सहाशे कैद्यांची सुटका होणार 

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली (पीटीआय) : महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त देशभरातील तुरुंगात किरकोळ गुन्ह्याप्रकरणी शिक्षा भोगणाऱ्या शेकडो कैद्यांची सुटका करण्यात येणार आहे. मात्र, हत्या, बलात्कार, दहशतवादी कारवाया आणि भ्रष्टाचार गुन्ह्यातील कैद्यांची सुटका होणार नाही. येत्या दोन ऑक्‍टोबर रोजी सुमारे 600 कैद्यांची सुटका होऊ शकते, असे अधिकाऱ्याने म्हटले आहे. यासंदर्भात राज्य आणि केंद्र शासित राज्य सरकारच्या सहकार्याने गृहमंत्रालयाकडून कैद्यांची नावे निश्‍चित केली जात आहेत. 

महात्मा गांधी जयंतीनिमित्त कैद्यांना विशेष सवलत देण्याच्या योजनेतंर्गत आतापर्यंत 1 हजार 424 कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. या कैद्यांची दोन टप्प्यांत 2 ऑक्‍टोबर 2018 रोजी आणि 6 एप्रिल 2019 रोजी सुटका करण्यात आली. तिसऱ्या टप्प्यातंर्गत यावर्षी दोन ऑक्‍टोबरलादेखील कैद्यांची सुटका केली जाणार आहे; परंतु हत्या, बलात्कार आणि भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरलेल्या गुन्हेगारांना या योजनेतून वगळण्यात आले आहे. याशिवाय देशभरातील दीडशे गांधीवादी नागरिकांचा सन्मान करण्यात येणार आहे. ज्यांनी निम्मी शिक्षा भोगली आहे आहे, तसेच ज्या महिला गुन्हेगारांचे वय 55 पेक्षा अधिक आहे आणि 60 पेक्षा अधिक वयाचे असणारे पुरुष गुन्हेगार आणि याबरोबरच अन्य श्रेणीतील कैद्यांची सुटका केली जाणार आहे. शिक्षेचा अर्धा कालावधी पूर्ण केलेल्या दिव्यांग कैद्यांची किंवा 70 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक अपंगत्व असलेल्या कैद्यांचीदेखील सुटका होणार आहे. यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची चाचपणी केली जाणार आहे. 

या कैद्यांची सुटका नाही 
दहशतवादी कारवायात सहभागी असलेले कैदी म्हणजेच 'पोटा', 'टाडा' प्रकरणातील गुन्हेगार तसेच 'यूएपीए' (अनलॉफुल ऍक्‍टिव्हिटीज), 'पोक्‍सो', फेमा आणि काळा पैसा व्यवहारप्रकरणी शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची सुटका केली जाणार नसल्याचे सांगण्यात आले. 

loading image
go to top