ब्रेकिग : अरुणाचल प्रदेशात मोठी चकमक; 6 नक्षलवादी ठार

वृत्तसंस्था
शनिवार, 11 जुलै 2020

सर्च ऑपरेशनमध्ये गोळीबार सुरु

इटानगर : अरुणाचल प्रदेशमध्ये पोलिस आणि आसाम रायफल्सच्या जवानांकडून संयुक्त कारवाई करण्यात आली. यामध्ये 6 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले. तर यामध्ये एक जवान जखमी झाला. ही चकमक अरुणाचल प्रदेशच्या लोंगडिंग जिल्ह्यात घडली. आत्तापर्यंत 4 एके-47 आणि दोन चायनीज एमक्यू जप्त करण्यात आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अरुणाचल प्रदेशच्या खोंसा परिसरात सुरक्षा दलातील जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरु झाली. आसाम रायफल्सचा एक जवान यामध्ये जखमी झाला. या जवानाला वैद्यकीय उपचारांसाठी लष्करी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबत सूत्रांनी सांगितले, की या चकमकीत ठार झालेले सर्व नक्षलवादी नागा उग्रवादी संघटनेचे असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहेत. ही चकमक पहाटे साडेचारच्या सुमारास सुरु झाली. या परिसरात या नक्षलवाद्यांकडून 6 हत्यारेही हस्तगत करण्यात आले. 

याबाबत अरुणाच प्रदेशचे डीजीपी आर. पी. उपाध्याय यांनी सांगितले, की लष्करातील आसाम रायफल्स आणि अरुणाचल प्रदेश पोलिसांनी शनिवारी सकाळी लोंगडिंग जिल्ह्यात संयुक्त कारवाई केली. यामध्ये 6 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. आम्हाला हे नक्षलवादी नगीनू गावात लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, छापा टाकत ही कारवाई करण्यात आली.  

सर्च ऑपरेशनमध्ये गोळीबार सुरु

या सूचनेच्या आधारावर पोलिस आणि आसाम रायफल्सच्या पथकाने मोठ्या प्रमाणात सर्च ऑपरेशन सुरु केले. यादरम्यान एका झोपडीत लपलेल्या 6 नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण गोळीबारानंतर लष्कर आणि पोलिसांच्या पथकाने या परिसराला घेरत ऑपरेशन सुरु केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six Militants killed in Operation in Arunachal Pradesh