भारताच्या प्रत्युत्तरात पाकचे सहा सैनिक ठार

वृत्तसंस्था
शनिवार, 28 डिसेंबर 2019

पाकिस्तान जम्मू-काश्‍मीरमधील नियंत्रणरेषेवर शस्त्रसंधी भंग करीत आहे. त्यांच्या सैनिकांकडून गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या गोळीबारात भारतीय सुभेदार व एका निरपराध महिलेला जीव गमवावा लागला. यावर याला ‘जशास तसे’ उत्तर देत जवानांनी गेल्या २४ तासांत पाकिस्तानच्या सहा सैनिकांना यमसदनी पाठविले आहे.​

जम्मू-काश्‍मीरमध्ये गेल्या २४ तासांत कारवाई
श्रीनगर - पाकिस्तान जम्मू-काश्‍मीरमधील नियंत्रणरेषेवर शस्त्रसंधी भंग करीत आहे. त्यांच्या सैनिकांकडून गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या गोळीबारात भारतीय सुभेदार व एका निरपराध महिलेला जीव गमवावा लागला. यावर याला ‘जशास तसे’ उत्तर देत जवानांनी गेल्या २४ तासांत पाकिस्तानच्या सहा सैनिकांना यमसदनी पाठविले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या कारवाईत पाकिस्तानच्या तीन चौक्‍याही उद्‌ध्वस्त केल्या आहेत. पाकिस्तानी सैनिकांनी गुरुवारी (ता. २६) रात्री पूँच आणि राजौरी भागात गोळीबार केला. भारतीय जवानांनी त्याला गोळीबाराने प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या सहा सैनिक मारले. भारतील लष्कराने काल हाजीपूर विभाहात मोठी कारवाई करीत पाकव्याप्त काश्‍मीरमधील देवा येथील दोन सैनिकांना मारले होते. यात अनेक सैनिक जखमी झाले आहेत.

उरी विभागामध्ये पाकिस्तानने बुधवारी (ता. २५) शस्त्रसंधीचा भंग करत गोळीबार केला, तसेच तोफगोळ्यांचाही मारा केला. या गोळीबारात सुभेदार दर्जाचा अधिकारी हुतात्मा झाला. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात चुरुनंदा गावातील नसीमा या युवतीचा मृत्यू झाला. त्याच्या दोन दिवस आधी कूपवाडामध्ये पाकिस्तानने केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात भारतीय लष्कराचा चालक सौरभ कटरा हुतात्मा झाला. दोन आठवड्यांपूर्वीच त्याचा विवाह झाला होता. सौरभ लष्कराच्या २८ आरआर रेजिमेंटमध्ये होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six Pakistani soldiers killed in response to India