बनावट दारू पिल्याने सहा जणांचा मृत्यू; तिघांची प्रकृती गंभीर

Six people die after drinking fake alcohol in bihar
Six people die after drinking fake alcohol in biharSix people die after drinking fake alcohol in bihar

बनावट दारू (alcohol) पिल्याने सहा जणांचा मृत्यू (die) झाला. याप्रकरणी आतापर्यंत ७० जणांना अटक करण्यात आली आहे, असे डीएम सौरभ जोरवाल यांनी सांगितले. ही घटना बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील मदनपूर ब्लॉकमधील मदनपूर आणि सलाया पोलिस स्टेशन हद्दीत घडली. (Six people die after drinking fake alcohol in bihar)

मिळालेल्या माहितीनुसार, मदनपूर पोलिस स्टेशन हद्दीतील खिरियावान चौधरी मोहल्ला येथे सोमवारी रात्री शिव साव, अनिल शर्मा, राहुल मिश्रा आणि अन्य एका व्यक्तीने मद्य प्राशन केले होते. यानंतर सर्वांच्या डोळ्यात जळजळ झाली. मदनपूर पीएचसीमध्ये उपचार केल्यानंतर शिव साव यांना मगध मेडिकल कॉलेज, गया येथे पाठवण्यात आले. मात्र, वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. अनिल शर्मा यांचा घरीच मृत्यू (die) झाला.

Six people die after drinking fake alcohol in bihar
इतिहासकार इरफान हबीब म्हणतात; ...तर लाल किल्ला-ताजमहाल तोडून बघा

अरुआ गावात राहणारा सुरेश सिंग मंगळवारी चौधरी मोहल्ला येथे आला होता. येथे दारू पिऊन घरी गेला होता. त्याची प्रकृती खालावल्याने सामुदायिक आरोग्य केंद्र मदनपूर येथे आणले असता मृत घोषित करण्यात आले. नातेवाइकांनी पोलिसांना न कळवता घाईघाईत अंत्यसंस्कार केले. त्याचवेळी खिरीवान गावातील रहिवासी भोला विश्वकर्मा, मदनपूरच्या कटैया येथील रहिवासी मनोज यादव आणि बेरी गावचे रहिवासी रवींद्र सिंह यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

औरंगाबादचे एसपी कांतेश कुमार मिश्रा यांनी सांगितले की, सुरेश सिंग, राहुल कुमार मिश्रा आणि अनिल शर्मा यांचा मृत्यू (die) बनावट दारू प्यायल्याने झाला. बनावट दारूमुळे (alcohol) झालेल्या मृत्युप्रकरणी आतापर्यंत ११ जणांना अटक करण्यात आली आहे. सोनू चौधरी, बिनेश चौधरी व बबिता देवी यांना अटक करण्यात आली आहे. यांच्याकडून दारूची विक्री केली जात होती. एका मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले, तर उर्वरित मृतदेहांवर नातेवाइकांनी अंत्यसंस्कार केले. चौधरी मोहल्ला येथील तीन घरांवर छापा टाकून दारू जप्त करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com