Manipur News : मणिपूरमध्ये कारवाईत सहा दहशतवादी अटकेत
Terrorism Arrested : मणिपूरमधील वेगवेगळ्या जिल्ह्यांत पोलिसांनी कारवाई करत सहा दहशतवाद्यांना अटक केली आहे. ही कारवाई बिष्णूपूर, इम्फाळ ईस्ट, इम्फाळ वेस्ट आणि कांगपोकपी जिल्ह्यांत करण्यात आली.
इम्फाळ : मणिपूरमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये केलेल्या कारवायांमध्ये सहा दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असल्याचे पोलिसांनी शनिवारी सांगितले. बिष्णूपूर, इम्फाळ ईस्ट, इम्फाळ वेस्ट आणि कांगपोकपी जिल्ह्यांमधून दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.