

Ten Years of Smart City Mission Yet Projects Remain Incomplete as New Deadline Ends and Implementation Faces Criticism
sakal
बेळगाव : ‘स्मार्ट सिटी’ अभियानांतर्गत बेळगाव शहरातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी दिलेली ऑक्टोबर २०२६ ची अंतिम मुदत संपली आहे. मात्र, मुदत संपूनही शहरातील ‘स्मार्ट सिटी’ची कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. विशेष म्हणजे, सध्या तीन कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती मिळाली आहे. व्हॅक्सिन डेपो परिसरातील काही कामे अद्याप शिल्लक असल्याने ‘स्मार्ट सिटी’ अभियानाच्या अंमलबजावणीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.