Congress : अण्णांच्या आंदोलनाचे प्रमुख नेते आज राहुल गांधींच्या भारत जोडो पदयात्रेत काय करतायत?

'त्याचं नेतृत्व चुकीच्या हातात गेलं ही आमची चूक होती.'
Bharat Jodo Yatra Yogendra Yadav
Bharat Jodo Yatra Yogendra Yadavesakal
Summary

'त्याचं नेतृत्व चुकीच्या हातात गेलं ही आमची चूक होती.'

काँग्रेस पक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते काश्मीर (Kanyakumari to Kashmir) अशी 'भारत जोडो यात्रा' (Bharat Jodo Yatra) काढत आहे. स्वराज इंडियाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव (Yogendra Yadav) हे देखील या यात्रेत सहभागी झाले आहेत.

काँग्रेस पक्षाच्या या पदयात्रेत सहभागी होण्याचं कारण काय? या प्रश्नाला उत्तर देताना योगेंद्र यादव म्हणाले, मी काँग्रेसचा (Congress) अजिबात नाही. पण, मी माझ्या पक्षाचा बिल्ला (अजेंडा) घेऊन चालत आहे. देश तोडण्याऐवजी संघटित होण्याचं काम करणाऱ्यांच्या पाठीशी असल्यामुळं मी आज इथं आलो आहे. उद्या इतर पक्षानंही असा प्रयत्न केला तर आम्ही त्यालाही पाठिंबा देऊ, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Bharat Jodo Yatra Yogendra Yadav
Lalbaug Raja Ganesh Visarjan : पुढच्या वर्षी लवकर या! अलोट गर्दीत लाडक्या लालबागच्या राजाला निरोप

'भारत जोडो यात्रे'बाबत यादव म्हणाले, 'संपूर्ण विरोधक सरकारला आव्हान देऊ शकतात. या क्रमानंच काँग्रेसनं पुढाकार घेतलाय. त्यामुळं देशभरात भारत जोडो उपक्रम राबवण्याची गरज आहे. म्हणूनच, आम्ही देखील या पदयात्रेत सहभागी झालो आहोत. देशातील मोठी माध्यमं या प्रकरणांचं वार्तांकन करणार नाहीत. पण, माझा विश्वास आहे की देशाला वाचवायचं असेल तर सध्याच्या सत्ताधारी पक्षाला सत्तेतून बाहेर फेकून द्यावं लागेल.'

Bharat Jodo Yatra Yogendra Yadav
Mamata Banerjee : मोदी सरकारवर वारंवार टीका करणाऱ्या ममतांनी आपल्याच खासदाराला झापलं

देशात जो द्वेष पसरलाय, तो दूर करणं हे माझं कर्तव्य समजतो. हिंदू-मुस्लिमांमधील द्वेष दूर करण्यासाठी भारत जोडोच्या माध्यमातून हे महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे, त्याला पाठबळाची गरज आहे. यावेळी योगेंद्र यादवांनी 2011 च्या आंदोलनाबाबत बोलताना सांगितलं की, त्या वेळी भ्रष्टाचार हा महत्त्वाचा मुद्दा होता. पण, त्याचं नेतृत्व चुकीच्या हातात गेलं ही आमची चूक होती. आता जे काही होतंय ते लाजिरवाणी बाब आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com