
Chingari App : 'चिंगारी'कडून महिलांना मासिक पाळीची पगारी सुट्टी जाहीर
नवी दिल्लीः सोशल App चिंगारीने आज एक आदेश काढून आपल्या महिला कर्मचाऱ्यांना दोन दिवसांची पगारी मासिक पाळी सुट्टी जाहीर केली आहे.
मासिक पाळीच्या दरम्यान महिलांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन अनेक देश आणि कंपन्या महिलांना मासिक पाळीमध्ये सुट्टीचा देण्याचा निर्णय घेत आहेत.
मासिक पाळीमध्ये महिलांना रजा देणं हे आरोग्याच्या दृष्टीने हिताचा निर्णय असल्याचं 'चिंगारी' प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे.
२०२२ मध्ये सुरु झालेलं चिंगारी ह्या सोशल Appच्या युजर्समध्ये लक्षणिय वाढ झाली आहे. हजारो महिला या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करतात. चिंगारी App त्यांच्या महिला युजर्ससाठी वेळोवेळी प्रशिक्षण आणि त्यांचा परफॉर्मन्स सुधारवण्यासाठी प्रयत्न करत असतं.
महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने 'चिंगारी'ने हा निर्णय घेतला असून महिला कर्मचाऱ्यांना दोन दिवस मासिक पाळीची पगारी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे.
स्पेनमध्ये कायदा मंजूर
स्पेनमध्ये 16 फेब्रुवारी रोजी ऐतिहासिक कायदा मंजूर झाला आहे. या कायद्यान्वये मासिक पाळीमध्ये महिलांना रजा मिळेल. हा कायदा आणणारा स्पेन हा युरोपतला पहिला देश ठरला आहे. स्पॅनिश संसदेमध्ये या कायद्याच्या बाजूने १८५ मतं तर विरोधात १५४ मतं पडली. मासिक पाळीमध्ये महिलांना वेदना सहन कराव्या लागतात, त्यामुळे त्यांना वैद्यकीय रजेची गरज असते. शिवाय मासिक पाळीबद्दल गैरसमज दूर करण्यचा उद्देश असल्याचं स्पेन सरकारने म्हटलं आहे.
आम्ही अवलंबलेलं धोरण महिला कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने नक्कीच उपयुक्त ठरेल. महिला कर्मचाऱ्यांचं सक्षमीकरण आणि कामाच्या ठिकाणी सर्वसमावेशकता निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं चिंगारीचे सहसंस्थापक आणि सीईओ सुमित घोष यांनी सांगितलं.