Uttarkhand Cloudburst Rescue: उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली गावात अचानक ढगफुटी झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत अनेक घरे, दुकाने, लॉज आणि पर्यटनस्थळे भरभरून वाहून गेली आहेत. बाजारपेठा आणि हॉटेल्सना देखील मोठा फटका बसला आहे. या घटनेत अनेक लोक बेपत्ता असल्याची देखील माहिती समोर आली आहे.