MP Jairam Ramesh : काही पक्ष ‘इंडिया’आघाडीत येण्यास उत्सुक’

पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार राममंदिर, मटण, मुसलमान, मंगळसूत्र यात गुंफण्याचा प्रयत्न केला.
MP Jairam Ramesh
MP Jairam Rameshsakal

नवी दिल्ली - मतदानाचे सहा टप्पे संपल्यानंतर मतदारांचा कल लक्षात आला असून ‘इंडिया’ आघाडीचे सरकार सत्तेवर येण्याचे स्पष्ट संकेत मिळाले असून भाजपप्रणित एनडीए आघाडीतील काही घटक पक्ष ‘इंडिया’ आघाडीत येण्यास उत्सुक असल्याचा दावा काँग्रेसचे सरचिटणीस, खासदार जयराम रमेश यांनी केला.

प्रचार संपल्यानंतर प्रचारातील मुद्दे व त्याचा मतदारांवर झालेल्या सकारात्मक परिणामाची माहिती देताना रमेश म्हणाले, काँग्रेसने पाच न्याय व पंचवीस गॅरंटीच्या आधारावर प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपच्या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीचा प्रचार राममंदिर, मटण, मुसलमान, मंगळसूत्र यात गुंफण्याचा प्रयत्न केला.

लोकांनी मात्र या गौण मुद्यांकडे लक्ष दिले नाही. काँग्रेस व ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी नेहमीच लोकांच्या मुद्यांवर भर दिल्याचा दावा त्यांनी केला. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये केलेल्या कामांचा आढावा घेण्याची चांगली संधी होती. परंतु या संधीचा फायदा त्यांना घेता आला नाही. या प्रचारामुळे लोकांमध्ये ‘इंडिया’ आघाडीबद्दल एक विश्वास निर्माण झाला असून येत्या ४ जूनला होणाऱ्या मतमोजणीच्या याचे परिणाम दिसून येणार आहे.

‘इंडिया’ आघाडीकडे मतदारांचा कौल असल्याने एनडीएतील घटक पक्षांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार ‘इंडिया’ आघाडीत समावेश होणार काय, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, त्यांनी अनेकदा पलटी मारलेली आहे. त्यामुळे ४ जूननंतर काय होईल, हे सांगता येत नाही. परंतु ‘एनडीए’तील अनेक घटक पक्ष ‘इंडिया’ आघाडीसोबत येण्यास उत्सुक आहेत.

काँग्रेसने आचारसंहिताभंगाच्या ११७ तक्रारी केल्या. पैकी १४ तक्रारी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल होत्या. यापैकी एकाही तक्रारीची दखल आयोगाने घेतली नाही, असे जयराम रमेश म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com