
Somyag Yadnya Utsav : म्हापसा येथे पाच फेब्रुवारीपासून ‘सोमयाग यज्ञ उत्सव’
सोमयाग म्हणजे काय?
भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या यज्ञसंस्थेत पाकयज्ञसंस्था, हविर्यज्ञसंस्था आणि सोमयज्ञसंस्था असे तीन प्रकार आहेत. यातील सोमयागाचे अग्निष्टोम, प्रत्याग्निष्टोम, उक्य, षोडशिन, वाजपेय, अतिरात्र आणि अप्तोर्याम असे सात प्रकार असतात. सोम वनस्पतीचा रस काढून केला जाणारा यज्ञ म्हणजे सोमयाग.
ऋत्विज कोण?
अग्निहोत्री सुहोता दीपक आपटे हे गोव्यातील अग्निहोत्र व्रत स्वीकारणारी, आपटे कुटुंबातील तिसरी पिढी. त्यांचे वडील सोमयाजी दीपक आपटे व आजोबा सोमयाजी महादेव (सखा) आपटे हे त्रेताग्नी उपासक होते.
अक्कलकोट निवासी परम् सद्गुरू श्रीगजानन महाराज यांच्या आज्ञेने १९६३ मध्ये आजोबा श्रीसखा दीक्षित आपटे यांनी प्रथम अखंड त्रेताग्नी अग्निहोत्र व्रत स्वीकारले. त्यांनी श्रद्धेने हे व्रत अखंड ४८ वर्षे केले. सुहोता आपटे यांनी पाच वर्षे गोव्यातील शांकर पाठशाळेत वैदिक शिक्षण घेतले.
त्यानंतर घरी आजोबांपाशी कृष्ण यजुर्वेद शाखा अध्ययन केले व श्रौत (अग्निहोत्रादिक) अध्ययन आजोबांकडेच केले, आणि २०१८ मध्ये अग्निहोत्र व्रत स्वीकारले व २०१८ मध्ये अक्कलकोट येथे सोमयाग करून सोमयाजी झाले. सोमयाजी सुहोता दीपक आपटे व सुहोता समृद्धी दीक्षित आपटे हे उभय दाम्पत्य या अग्निष्टोम सोमयागाचे यजमानपद भूषविणार आहेत.
सोमयाग यज्ञ आणि त्याचे वैज्ञानिक फायदे
सोमयाग यज्ञामुळे हवेतील प्रदूषणाचे कमी होऊ शकते, असे डॉ. प्रणय अभंग सांगतात. सोमयाग यज्ञामुळे हवेतील सूक्ष्मजीवांचा भार ९० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो, तसेच आजूबाजूच्या वातावरणातील अनेक विषाणू नष्ट होऊ शकतात किंवा निष्क्रिय होऊ शकतात.
याशिवाय सल्फर ऑक्साईडचे (SOx) प्रमाण सुरवातीच्या पातळीपेक्षा दहा पटींपर्यंत कमी होते. या यज्ञाचे अनेक दीर्घकालीन परिणाम आहेत. प्रणय अभंग यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘यज्ञ आणि वैज्ञानिक अभ्यास’ या विषयावर प्रबंध सादर केला होता.
अभंग यांच्या प्रबंधानुसार नायट्रोजन ऑक्साईड (NOx) पातळी निश्चित केलेल्या मानकं किंवा ‘थ्रेशोल्ड’ पातळी ओलांडत नसल्याचेही निदर्शनास आले.
पणजी : परशुरामांची भूमी अशी ओळख असलेल्या गोव्यातील पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धनासाठी गोमन्तक - सकाळ समूहातर्फे सोमयाग यज्ञ उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा दिवस हा ‘यज्ञ उत्सव’ चालणार आहे.
म्हापसा येथे ५ ते १० फेब्रुवारी या कालावधीत सकाळ, गोमन्तक आणि गोमन्तक टाइम्सतर्फे ‘सोम याग यज्ञ महोत्सव २०२३’ होईल. या सहा दिवसांतील अनुभव प्रसन्न करणारा, स्वत:शी एकरूप करणारा आणि आध्यात्मिक स्वरूपाचा असेल. शांतता प्रस्थापित करणे तसेच गोव्यातील पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करणे हा ‘सोमयाग यज्ञ महोत्सवा’चा उद्देश आहे.
महोत्सवात नेमके काय?
ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद यांतील काही निवडक मंत्रांचे पठण यावेळी केले जाईल. आपल्यातील ऊर्जेला सकारात्मकतेकडे नेण्यासाठी पवित्र अग्नीही प्रज्वलित केला जाईल.
महोत्सव कुठे?
विश्वाटी विश्वेश्वर देवस्थान, म्हापसा-कळंगुट रोड, श्री देव बोडगेश्वर मंदिराजवळ, काणका, म्हापसा, गोवा
महोत्सव कधी?
५ ते १० फेब्रुवारी २०२३,
वेळ सकाळी ६.३० ते रात्री ९ पर्यंत.