भाजप खासदार रूपा गांगुलींच्या मुलाला अटक

वृत्तसंस्था
Friday, 16 August 2019

गोल्फ ग्रीनच्या भिंतीला आकाशची गाडी जोरात धडकल्याने ही भिंत पडली. तसेच आकाशच्या गाडीचेही नुकसान झाले आहे. प्रचंड वेगात असल्याने आकाशचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी जोरात भिंतीला धडकली व यामुळे भिंतीचे नुकसान झाले. आकाश किरकोळ जखमी असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

कोलकाता : भाजपच्या खासदार रूपा गांगुली यांच्या मुलाच्या गाडीचा अपघात झाला असून रॅश ड्रायव्हिंगसाठी त्याला अटक करण्यात आली आहे. गांगुली यांचा मुलगा आकाश मुखर्जी याने काल (ता. 15) गोल्फ ग्रीनच्या सुरक्षा भिंतीवर गाडी धडकवली.

गोल्फ ग्रीनच्या भिंतीला आकाशची गाडी जोरात धडकल्याने ही भिंत पडली. तसेच आकाशच्या गाडीचेही नुकसान झाले आहे. प्रचंड वेगात असल्याने आकाशचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि गाडी जोरात भिंतीला धडकली व यामुळे भिंतीचे नुकसान झाले. आकाश किरकोळ जखमी असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन व वेगाने गाडी चालवली यामुळे आकाशला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: son of BJP MLA Roopa Ganguly arrested for rash driving