Sonali Phogat : क्लबमध्ये जबरदस्तीने पाजले ड्रग्स? CCTV फुटेज समोर

Sonali Phogat
Sonali Phogatesakal
Updated on

भाजप नेत्या सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सोनाली यांना डान्स फ्लोअर वर कोणता तरी पदार्थ पिण्यास कोणीतरी जबरदस्ती करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.(sonali phogat was forced to drink alcohol in the club just before her death cctv footage surfaced)

सोनाली फोगाट यांचे काही फुटेज गोवा पोलिसांच्या हाती लागले होते. यावेळी त्यांनी ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे सोनाली यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, आता सीसीटीव्हीचे काही फुटेज समोर आले आहेत. त्यामध्ये त्यांना जबरदस्तीने मद्यपान देण्यात येत असल्याचा तर्क लावण्यात येत आहे. तसेच पोलिसांच्या माहितीनुसरा, सहाय्यक सोनाली यांना तिच्या मृत्यूपूर्वी हॉटेल ग्रँड लिओनीमध्ये घेऊन गेला, जिथे ते सर्वजण राहत होते.

दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तपास अधिकाऱ्याने संबंधित आवारातील सीसीटीव्ही रेकॉर्डिंग तपासले आणि असे आढळून आले की, सुधीर सोनालीला पाण्याची बाटली पिण्यास भाग पाडत होता.

गोवा पोलिसांनी शनिवारी सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी अटक केलेल्या दोन आरोपींना आणि अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या संशयित तस्कराला ताब्यात घेतले. अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही आरोपींनी संशयिताकडून ड्रग्ज खरेदी केल्याची कबुली दिली होती, त्यानंतर संशयित ड्रग्ज तस्कर दत्तप्रसाद गावकर याला अंजुना येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, ताब्यात घेतलेल्या आणखी एका व्यक्तीचे नाव कर्लीज रेस्टॉरंटचे मालक एडविन नुनेस असे आहे, जेथे फोगट 22 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा पार्टी करत होते. त्यांना सेंट पीटर्सबर्ग येथील हॉटेलमधून मृत आणण्यात आले.

दरम्यान, त्यांच्या कुटूंबियांनी हरीयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांची भेट घेतली. आणि सीबीआय चौकशीची मागणी केली. ज्यावर हरियाणा सरकार गोवा सरकारला पत्र लिहिणार आहे. कुटुंबीयांच्या मागणीनुसार हरियाणा सरकार गोवा सरकारला सीबीआय चौकशीची विनंती करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com