
नवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी शंभर वर्षांपूर्वी बेळगाव येथे देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळली होती. परंतु आज महात्मा गांधी यांच्या वारशावर दिल्लीत सत्तारूढ पक्षाकडून हल्ला करण्यात येत आहे. ज्यांनी महात्मा गांधी यांच्या विचाराला कडवट विरोध केला व त्यांची हत्या केली त्यांचे गौरवीकरण केले जात असल्याचा आरोप काँग्रेस संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी यांनी आज केला आहे.