Rahul Gandhi: नॅशनल हेराल्ड केसमध्ये ईडीने काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांविरोधात चार्जशीट दाखल केलं आहे. या केसमध्ये ईडीने आरोपींवर ९८८ कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा आरोप ठेवला आहे. दुसरीकडे काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांचे पती आणि उद्योगपती रॉबर्ट वाड्रा यांच्या विरोधात गुरुग्राम जमीन डील केसमध्ये बुधवारी दुसऱ्यांदा चौकशी झाली.