
नवी दिल्ली : ‘‘गर्भवती महिलांसाठी जाहीर करण्यात आलेल्या पंतप्रधान मातृवंदना योजनेसाठी करण्यात आलेली निधीची तरतूद अपुरी असल्याने लाभार्थींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे; केंद्र सरकार असे का होऊ देत आहे,’’ असा सवाल आज काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्यसभेत केला.