esakal | दिल्लीतील प्रदुषणामुळे सोनिया गांधी गोव्यात;श्वसनाच्या त्रासामुळे डॉक्टरांचा सल्ला 
sakal

बोलून बातमी शोधा

sonia gandhi

श्वसनाचा त्रास टाळण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी गोव्यात पोहोचल्या आहेत. दिल्लीतील प्रदूषण कमी होईपर्यंत त्या गोव्यातच थांबतील. राहुल गांधीही त्यांच्यासोबत पणजीमध्ये दाखल झाले आहेत. 

दिल्लीतील प्रदुषणामुळे सोनिया गांधी गोव्यात;श्वसनाच्या त्रासामुळे डॉक्टरांचा सल्ला 

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - राष्ट्रीय राजधानी दिल्लीला प्रदूषणाने विळखा घातल्यामुळे श्वसनाचा त्रास टाळण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी गोव्यात पोहोचल्या आहेत. दिल्लीतील प्रदूषण कमी होईपर्यंत त्या गोव्यातच थांबतील. राहुल गांधीही त्यांच्यासोबत पणजीमध्ये दाखल झाले आहेत. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दम्याचा त्रास असलेल्या सोनियाना डॉक्टरांनी काही दिवसांसाठी दिल्लीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. हवापालट म्हणून त्या चेन्नई किंवा गोवा येथे जाऊ शकतात. त्यांच्यासोबत राहुल किंवा प्रियांका गांधी जातील, असेही सांगण्यात आले होते. अखेरीस त्यांनी गोव्याची निवड केली असून आज दुपारीच दिल्लीतून निघून त्या पणजीत पोहोचल्या. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

याआधीही जुलैमध्ये प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोनिया यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सप्टेंबरमध्ये आरोग्य तपासणीसाठी त्या परदेशातही गेल्या होत्या. त्याही वेळी राहुल त्यांच्यासोबत होते. तेव्हा त्यामुळे हे माता-पुत्र संसद अधिवेशनामध्ये सहभागी होऊ शकले नव्हते. 

loading image