esakal | कोरोनाशी लढण्यासाठी सर्वसम्मत राष्ट्रीय धोरण बनवावं; काँग्रेस केंद्रासोबत

बोलून बातमी शोधा

कोरोनाशी लढण्यासाठी सर्वसम्मत राष्ट्रीय धोरण बनवावं; काँग्रेस केंद्रासोबत

कोरोनाशी लढण्यासाठी सर्वसम्मत राष्ट्रीय धोरण बनवावं; काँग्रेस केंद्रासोबत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. देशामध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कोरोनाच्या जागतिक महासाथीशी दोन हात करण्यासाठी राष्ट्रीय धोरणावर सर्वांची राजकीय सम्मती बनवण्याची विनंती शनिवारी केली. सोनिया गांधी यांनी आपल्या संबोधनात म्हटलं की, आता ही वेळ आलीय की, केंद्र तसेच राज्य सरकारांनी जागं व्हावं आणि आपलं कर्तव्य पार पाडावं. त्यांनी म्हटलं की, कोरोनाची लस सर्व नागरिकांना मोफत दिली गेली पाहिजे. काँग्रेस अध्यक्षांनी म्हटलं की, मी केंद्र सरकारला विनंती करते की देशात कोरोना संकटाशी मुकाबला करण्यासाठी राष्ट्रीय धोरण तयार केलं जावं आणि यासाठी सर्वांची राजकीय सम्मती घेतली जावी. केंद्र आणि राज्य सरकारने आपल्या कर्तव्याप्रती जागं होण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा: कोरोनाचा धसका! भारतातून आल्यास 5 वर्षांचा तुरुंगवास आणि दंड

गरीब परिवारांना मदत पोहोचवा : सोनिया गांधी

सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारकडे विनंती केली की, त्यांनी गरीब कुटुंबांच्या खात्यावर सहा हजार रुपये पोहोचवावेत जेणेकरुन सध्याच्या संकटकाळात त्यांना मदत मिळू शकेल. तसेच त्यांनी चाचण्या वाढवण्यात तसेच आवश्यक जीवन रक्षक औषधांच्या काळाबाजाराला अटकाव घालण्याची देखील विनंती केली आहे.

पुढे त्यांनी म्हटलं की, काँग्रेस पक्ष जागतिक महासाथी दरम्यानच्या लढाईमध्ये केंद्रासोबत उभी राहिल. तसेच त्यांनी सर्व भारतीयांना या कठिण समयी एकजूट राहण्याची विनंतीही केली. भारतात गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाच्या संक्रमणामुळे एका दिवसामध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक चार लाखहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तसेच उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 32 लाखांच्या पार गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचे 4,01,993 नवे रुग्ण समोर आले आहेत. त्यानंतर संक्रमितांची एकूण संख्या वाढून 1,91,64,969 वर पोहोचलीय तर 3,523 रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर एकूण मृतांची संख्या 2,11,853 वर पोहोचली आहे.