सोनू सूदची बहीण लढणार पंजाब विधानसभेची निवडणूक; पक्ष कोणता? | Punjab Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोनू सूदची बहीण लढणार पंजाब विधानसभेची निवडणूक; पक्ष कोणता?

सोनू सूदची बहीण लढणार पंजाब विधानसभेची निवडणूक; पक्ष कोणता?

अभिनेता सोनू सूदची बहिण पुढच्या वर्षी होणाऱ्या पंजाब विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरणार आहे. सोनू सूदची बहिण मालविका सूद निवडणूक लढवणार हे सांगितलं असलं तरी ती कोणत्या पक्षातून रणांगणात उतरणार हे मात्र अद्याप स्पष्ट नाही.

मोगा इथं घेतलेल्या पत्रकार परिषदेत सोनू सूनदे याबाबतची माहिती दिली. काही दिवसांपूर्वी सोनू सूदने पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांची भेट घेतली होती. त्यामुळे मालविका सूद काँग्रेसकडून निवडणूक लढणार का अशी चर्चा रंगली आहे.

मालविका यांनी मुख्यमंत्री चन्नी यांच्याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांचीही भेट घेतली होती. तसंच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. त्यामुळे काँग्रेस किंवा आम आदमी पार्टीकडून मालविका निवडणूकन लढवू शकतात असंही म्हटलं जात आहे. पक्ष अद्याप ठरलेला नाही, तसंच कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार हेही सांगितलेलं नाही. तरीही मोगामधून त्या निवडणुक लढवण्याची शक्यता आहे.

loading image
go to top